Cabinet Expansion : अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी 'या' 4 आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची लागणार वर्णी?

Cabinet Expansion : अजित पवार गटाकडून मंत्रिपदासाठी ‘या’ 4 आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची लागणार वर्णी?

| Updated on: Dec 15, 2024 | 12:23 PM

हिवाळी अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी अनेक नेते रात्रभर वर्षा आणि सागर बंगल्यावर दाखल होत भेटीगाठी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथवधी नागपूरात आज संध्याकाळी होत आहे. येत्या 16 डिसेंबर म्हणजे उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे. दरम्यान या हिवाळी अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी अनेक नेते रात्रभर वर्षा आणि सागर बंगल्यावर दाखल होत भेटीगाठी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजेच शपथविधीपूर्वी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग करण्यात आले आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चार मंत्र्यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. तर आज संध्याकाळी चार वाजता नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून यावेळी भाजपचे 21, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Dec 15, 2024 12:23 PM