‘टायगर अभी जिंदा है’, परळीत कार्यकर्त्यांची बॅनरबाजी; 50 फुटी पोस्टरची चर्चाच चर्चा!
VIDEO | धनजंय मुंडे अपघातातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदा परळीत जाणार, स्वागतासाठी परळी सजली, 50 फुटी बॅनर्स,चर्चाच चर्चा!
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सजली आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. या अपघातातून धनंजय मुंडे सुखरूप बचावले आहेत. उद्या धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीतील अपल्या मतदारसंघात दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात ५० फुटी बॅनर लावण्यात आलेत. ‘टायगर अभी जिंदा है’, अशा आशाचे बरेच बॅनर जागो-जागी लावले आहेत. तर परळी शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराला कमानीने सजवण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता गहिनीनाथ गडावर दर्शन करून धनंजय मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वैजनाथ मंदिर, गोपीनाथ गड येथे दर्शन झाल्यानंतर त्यांचं ठीक ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. या स्वागतानंतर त्यांची जाहीर सभा होईल. रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, मुंबईतून ढोल पथक मागविण्यात आले आहे.