चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं, राष्ट्रवादीची टीका; यासह जाणून घ्या दिवसभरातील बातम्या
शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आज फैसला होण्याची शक्यता, यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
सावित्रीबाई घरोघरी दिसतात पण चंद्रकांतदादांसारख्या ज्योतिबांचा शोध जारी असल्याचे विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं असून त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे आणि त्यांची डोकं देखील फिरलं आहे, अशी राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे.
पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान सुरू असून भाजप विरूद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत. ५ मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे तर सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून लढत असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर नागपुरात गाणार-आडबोल यांच्यामध्ये देखील चुरशीची लढत असून गटबाजीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासह अमरावतीमध्ये डॉ. रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे यांच्यात लढत तर मराठवाड्यात किरण पाटील- विक्रम काळे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. तर कोकण विभागामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत सामना पाहायला मिळत असून शेकापच्या बाळाराम पाटील आणि भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंमध्ये लढत.
शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने दोन दिवस पाणी कपात असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार…