नालायक जितेंद्र आव्हाड रामांना मांसाहारी म्हणतोय, भाजपचा राग अनावर, कुणी केला हल्लाबोल?

नालायक जितेंद्र आव्हाड रामांना मांसाहारी म्हणतोय, भाजपचा राग अनावर, कुणी केला हल्लाबोल?

| Updated on: Jan 03, 2024 | 11:41 PM

म बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते. रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय.

नाशिक, ३ जानेवारी २०२४ : राम बहुजनांचा राम आहे. राम शाहकारी नव्हते, मांसाहारी होते. रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो. राम १४ वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. यावरून अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनीही जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, रामायणात शुर्पनका देखील रावणाला सांगते, प्रभू राम आणि लक्ष्मण हे दोघे वनवासात कंदमुळे, फळं खातात. पण हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो, राम मांसाहारी होते. शरद पवार आणि त्यांचा पक्ष कुठल्या थराला गेला पाहिलात ना… प्रभू श्रीरामांवर आव्हाडांनी गरळ ओकली आहे, दीड दमडीच्या राजकारणासाठी तुम्ही कुठल्या थराला जात आहात. शरद पवार तुमच्या चेल्या चपाट्यांना सुधरायला सांगा, असा इशाराही त्यांनी दिला.

Published on: Jan 03, 2024 11:41 PM