‘हुकमाचा एक्का अन् मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाचं पक्का, सासूरवाडीनंतर आता कुठं झळकले बॅनर्स

‘हुकमाचा एक्का अन् मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादाचं पक्का, सासूरवाडीनंतर आता कुठं झळकले बॅनर्स

| Updated on: Apr 26, 2023 | 9:24 AM

VIDEO | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’?, ‘वचनाचा पक्का असल्याचे म्हणत कार्यकर्त्यांनी कुठं केली अजित पवारांबद्दल बॅनरबाजी?

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. धाराशीव जिल्ह्यातील तेर ही अजित पवार यांची सासूरवाडी आहे. तेरच्या चौकाचौकात हे बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेही फोटो आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुमकिन हैं क्या नमकिन हैं याच्याशी आमचं देणं घेणं नाही. पुढच्या काळात यांचा सुपडा साफ झाला पाहिजे, तेव्हाच यांच्या सत्तेचा मस्ती आटोक्यात येईल, असं आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली. अशातच आता राज्याच्या उपराजधानीतंही अजित पवार हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असे होर्डिंग्ज झळकल्याचे पाहायला मिळाले. यावर ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ असे लिहिले असून होर्डिंग्जवर शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसताय. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी होर्डिंग्ज लावल्यांची माहिती समोर येत आहे.

Published on: Apr 26, 2023 09:23 AM