भाजप नेत्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अनिल देशमुख यांनी थेट म्हटलं…
VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशावरील चर्चांना उधाण, अनिल देशमुख काय म्हणाले?
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाजप माझा पक्ष आहे. पण मी भाजपची थोडीच आहे, असं वक्तव्य केले होते. यामुळे भाजपात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज पंकजा मुंडे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमुळे चर्चांना उधाण आल्याचे दिसतेय. या भेटीमागे नेमकं कारण काय? पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. या सर्व चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सूचक असे भाष्य केले आहे. एकनाथ खडसे पूर्वी भाजपात होते. खडसे आणि पंकजाताई यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आज पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे भेट होणार आहे. कुठल्याही पक्षात इनकमिंग असतेच. पण पंकजा ताईबाबत माहीत नाही. मात्र, आता खडसे आणि पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावरच या भेटीत काय निर्णय झाला हे समजणार आहे.