अन् नवाब मलिक यांच्या लहान भावाला रडू कोसळलं...दीड वर्षातल्या घडामोडी सांगताना झाले भावूक

अन् नवाब मलिक यांच्या लहान भावाला रडू कोसळलं…दीड वर्षातल्या घडामोडी सांगताना झाले भावूक

| Updated on: Aug 11, 2023 | 8:34 PM

VIDEO | नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचा लहान भाऊ कप्तान मलिक यांची 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया, गेल्या दीड वर्षांपासून कुटुंब कोणत्या संकटातून जात होतं त्या घडामोडी सांगताना अश्रू अनावर...

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे लहान भाऊ कप्तान मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना प्रतिक्रिया देताना रडू कोसळलं. “सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने आमची दोन महिन्यांसाठी बेल मंजूर केली यासाठी मी सुप्रीम कोर्टाचा अतिशय आभारी आहे. नवाब मलिक यांची प्रकृती एक वर्षापासून खूप खराब झाली होती. त्यांची एक किडनी फेल झाला होता. अखेर त्यांना उपचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत”, असं कप्तान मलिक म्हणाले. तर “नवाब मलिक माझे मोठे बंधू आहेत. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. 10 वर्षे झाले, आमचे वडील या जगात नाहीयत. नवाब मलिक आमचे वडील आणि भाऊ दोन्ही होते. दीड वर्षात आमच्या कुटंबासोबत जे घडलं आहे, आम्ही कसे दिवस काढले ते आम्हालाच माहिती”, असं बोलत असताना कप्तान मलिक यांना रडू कोसळलं.

Published on: Aug 11, 2023 08:28 PM