मुख्यमंत्री शिंदे यांच्या 'त्या' वक्तव्याचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले....

मुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवार यांनी घेतला समाचार, म्हणाले….

| Updated on: May 28, 2023 | 4:17 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केलेल्या त्या टीकेवर शरद पवार यांनी दिलं प्रत्युत्तर अन् केली सडकून टीका

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाच्या झालेल्या उद्घाटन सोहळ्याला विरोधकांनी बहिष्कार घातला. संसदेच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहणं ही विरोधकांची पोटदुखी आहे. जनताच त्यांची पोटदुखी दूर करेल. त्यांना जमाल गोटा देऊन जनता धडा शिकवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खसपूस समाचार घेतला आहे. शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारची भाषा शोभते. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. त्यांच्या बुद्धीला जे शोभते ते बोलतात. त्यावर आपण काही भाष्य करू नये, अशी टीका शरद पवार यांनी केली. तर सामाजिक ऐक्याला धक्का बसेल असे प्रश्न कोणीही काढू नये, असं आवाहन त्यांनी लव्ह जिहादच्या प्रश्नावर बोलताना केलं. एमआयएमचे नेते ओवैसी यांनी लव्ह जिहादच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सवाल केला होता. त्यावर ते बोलत होते.

Published on: May 28, 2023 04:17 PM