समीर वानखेडे प्रकरणात सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, ‘लोकांच्या घरामध्ये घुसून…’
VIDEO | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकारणावरून सुप्रिया सुळे यांची सरकारवर जोरदार टीका
पुणे : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक जे बोलत होते ते आता खरं व्हायला लागलं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तर शाहरुख खान हा मोठा अभिनेता आहे त्यांच्या मुलाबाबत असे होत असेल तर सामान्यांच्या मुलांचे काय हाल होत असतील? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचा मुद्दा मी संसदेत मांडणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या, माझी केंद्र सरकारला विनंती आहे, ते ईडी सीबीआयचा वापर करून लोकांच्या घरामध्ये घुसून बायका पोरांवर असा अन्याय करणं चुकीचं आहे. त्यामुळे याप्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.