अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की… कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
'अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा... अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून ही मागणी करतात. त्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर ही रिचार्जवर चालणारी बाई आहे,', अंजली दमानिया यांनी केलेल्या 'त्या' मागणीवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे हिट अँड रन केसवरून पोलीस अधिकारी निलंबित झालेत. ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली असून या प्रकऱणाचा तपास वेगानं सुरू आहे. अशातच आता अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी होत आहे. आरोपीला मदत केल्याच्या आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा… अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून ही मागणी करतात. त्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर ही रिचार्जवर चालणारी बाई आहे, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. तर दमानिया बाईंना सुपारी मिळाली की त्या मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासाचा अशी माझी सरकारकडे मागणी आहे. दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे? अशी शंकाही सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

