Ladki Bahin Yojana : आमचं सरकार येताच महिलांना 8,500 रूपये देणार, शिंदे सरकारच्या घोषणेनंतर कोणाचं वक्तव्य?
Jitendra Awhad On Ladki Bahin Yojana : सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यावा, यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही महिलांना साडे आठ हजार रूपये देणार आहोत. आम्ही कबूल केलं आहे...'
लेक लाडकी योजना ही राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दोन महिन्यांसाठी अकाऊंटमध्ये पैसे टाकून मत मिळवण्याची ही योजना आहे. लोकसभेच्या पराभवानंतर अशा योजना जाहीर केल्यात. कुठून घरातले पैसे द्यायचे. महाराष्ट्राच्या डोक्यावर ७ लाख कोटी रूपये कर्ज होतं. अशा योजनांमार्फत लाभ देऊन आणखीन महाराष्ट्र डुबेल..’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘हे दीड हजार असेच दिल्यासारखे आहे. आम्ही महिलांना साडे आठ हजार रूपये देणार आहोत. आम्ही कबूल केलं आहे. आमचं सरकार आलं की आम्ही महिलांना साडे आठ हजार रूपये देणार आहोत’, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Published on: Jul 03, 2024 04:29 PM
Latest Videos