सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी घेतली थार गाडीची ड्राईव्ह, बघा व्हिडीओ

सांगलीमध्ये जयंत पाटील यांनी घेतली थार गाडीची ड्राईव्ह, बघा व्हिडीओ

| Updated on: Aug 15, 2023 | 10:38 PM

VIDEO | सांगलीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची नवी कोरी थार गाडी चालवण्याचा आनंद जयंत पाटील यांनी घेतला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी पद्माकर जगदाळे यांची ही थार गाडी होती. जयंत पाटील गाडी चालवत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी पद्माकर जगदाळे, संजय बजाज, मेनुदिन बागवान गाडीत बसले होते.

सांगली, १५ ऑगस्ट २०२३ | गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चांगलेच चर्चेत होते. जयंत पाटील गेले चार दिवस तणाव पूर्ण वातावरणात होते. मात्र आज ते हसतमुख असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सांगलीत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्याची नवी कोरी थार गाडी चालवली. सांगलीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची नवी कोरी थार गाडी चालवण्याचा आनंद जयंत पाटील यांनी घेतला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी पद्माकर जगदाळे यांची ही थार गाडी होती. सांगली मधील राष्ट्रवादीच्या कार्यालयापासून मिरजमध्ये काही कार्यक्रमासाठी जाताना जयंत पाटील यांनी थार गाडी चालवली. जयंत पाटील गाडी चालवत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी पद्माकर जगदाळे, संजय बजाज, मेनुदिन बागवान गाडीत बसले होते.

Published on: Aug 15, 2023 10:38 PM