VIDEO : Thane NCP Protest | राजभवनाकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं
राज्यात अनेक ठिकाणी राज्यपालांविरोधात जोरदार आंदोलने देखील केली जात आहेत. ठाण्यातून राजभवनाकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले आहे. राज्यपालांच्या विधानाविरोधात हा मोर्चा ठाण्यातून राजभवनाकडे निघाला होता.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून (Mumbai) गुजराती आणि राजस्थानी लोकांचा पैसा काढून घेतला तर मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असे मोठे आणि धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभरातून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका होतयं. राज्यात अनेक ठिकाणी राज्यपालांविरोधात जोरदार आंदोलने देखील केली जात आहेत. ठाण्यातून राजभवनाकडे निघालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले आहे. राज्यपालांच्या विधानाविरोधात हा मोर्चा ठाण्यातून राजभवनाकडे निघाला होता. मात्र, पोलिसांनी रस्त्यामध्येच या मोर्चाला रोखले आहे. यादरम्यान काही काळ मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती.
Published on: Aug 01, 2022 01:14 PM
Latest Videos