'रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल, पण...', कोल्हापुरातील शरद पवार यांच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

‘रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल, पण…’, कोल्हापुरातील शरद पवार यांच्या सभेत रोहित पाटील आक्रमक

| Updated on: Aug 25, 2023 | 8:24 PM

VIDEO | 'तर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपला भीमटोला देण्याची गरज', शरद पवार यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांचा इशारा काय?

कोल्हापूर, २५ ऑगस्ट २०२३ | अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून शिवसेना आणि भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता शरद पवार यांनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आणि पक्षाची ताकद दाखवण्यासाठी राज्यभरात जाहीर सभाचा सपाटा लावला आहे. दरम्यान आज कोल्हापूरात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. यासभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर.पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी आक्रमक होत भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणाही साधला. ते म्हणाले, ‘आपल्याला आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल.. पण येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायचीच आणि दिल्लीला महाराष्ट्राची काय ताकद आहे हे दाखवून द्यायची. आणि हीच वेळ आहे ताकद दाखवून द्यायची.’ पुढे ते असेही म्हणाले, भाजपच्या काळात महापुरूषांचा अपमान होताना दिसतंय. कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करतं तर कुणी आंबेडकर, शाहु फुले यांच्या विचारांचा अपमान करतं. ज्या फुले दाम्प्त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला त्यांचा अपमान होत असेल तर येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजपला भीमटोला देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Published on: Aug 25, 2023 08:24 PM