मंत्रालयात प्रवेश करताय? ‘या’ नवीन नियमांचे करावे लागणार पालन, गृह विभागाकडून सूचना जारी
VIDEO | मंत्रालयातील वारंवार होणाऱ्या आत्महत्येचे प्रयत्न आणि सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून नव्या सूचना जारी केल्या आहेत. या जारी केलेल्या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना यापुढे प्रवेश पास बंधनकारक असणार
मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ | मुंबई मंत्रालयात तुमचं वारंवार काम असतं का? आता मंत्रालयात प्रवेश करताना काही नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंत्रालयातील वारंवार होणाऱ्या आत्महत्येचे प्रयत्न आणि सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना यापुढे प्रवेश पास बंधनकारक असणार आहे. मंत्रालयात येणाऱ्यांना गार्डन गेटवर अद्यावत सुरक्षा तपासणी कक्ष उभारण्यात येणार आहे. तर गृहविभागाकडून १५ दिवसात ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू कऱण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. तर मंत्रालयात यापुढे केवळ मंत्री आणि सचिवांच्या गाड्यांनाच प्रवेश मिळणार आहे. खासगी गाड्यांना योग्य ती परवानगी घेऊनच प्रवेशे दिला जाणार आहे.