Nitesh Rane | संजय राऊत स्वत:ला शिवसैनिक मानत नाहीत का? नितेश राणे यांचा सवाल

| Updated on: Sep 21, 2021 | 8:18 PM

यापूर्वीच म्हणालो होतो संजय राऊत हे शरद पवारांचे लोमटे त्यावर आज सर्टिफिकेट लागलं. संजय राऊत यांचं वैयक्तिक मत काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं. संजय राऊत स्वतःला शिवसैनिक मानत नाहीत का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई : अधिवेशन झालं नाही तर इतर मार्गाचा अवलंब करणार यांना तुरुंगात धाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अनंत गीते कडवट शिवसैनिक आहेत. ते बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आहेत, ते काँग्रेसला कधीही स्वीकारू शकत नाहीत. संजय राऊत, आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई, राहुल कनाल, सचिन अहिर हे कडवट शिवसैनिक नाहीत. अनंत गीते कडवट शिवसैनिकांची भाषा बोलले. कडवट शिवसैनिक महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थ आहेत. एका बाजूला अनंत गीते म्हणतात की, बाळासाहेब आमचे नेते तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत म्हणतात शरद पवार आमचे नेते. यापूर्वीच म्हणालो होतो संजय राऊत हे शरद पवारांचे लोमटे त्यावर आज सर्टिफिकेट लागलं. संजय राऊत यांचं वैयक्तिक मत काय आहे ते त्यांनी स्पष्ट करावं. संजय राऊत स्वतःला शिवसैनिक मानत नाहीत का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.