Ajit Pawar | निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीची नेमणूक केली जात नाही : अजित पवार

Ajit Pawar | निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीची नेमणूक केली जात नाही : अजित पवार

| Updated on: Sep 02, 2021 | 1:49 PM

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. “आम्ही पहिली 12 नावं मंत्रिमंडळाने दिली. असं बोललं जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमलं जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. मात्र अरुण जेटलींचा पराभव झाल्यानंतर त्यांना नरेंद्र मोदींनी राज्यसभेवर घेतलं होतं” असं अजित पवार म्हणाले.