Navneet Rana यांच्या तक्रारीनंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस

| Updated on: Mar 30, 2022 | 7:50 PM

पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात तर मी ईडी आणि सीबीआयकडेही धाव घेणार आहे. आरती सिंग यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं असून सिंग या निलंबित होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

नवी दिल्ली: आपल्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह सहा जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता. संसदेने हा हक्कभंग (privilege motion) दाखल करून घेतला असून मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह या सहाही जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सहाही पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत हजर राहून आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना खूष करण्यासाठीच आमच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात तर मी ईडी आणि सीबीआयकडेही धाव घेणार आहे. आरती सिंग यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं असून सिंग या निलंबित होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.