Pune Ambil Odha | आंबिल ओढ्यात कारवाई, घरं नाहीत, आमच्यावर उलटू नका, वृद्ध महिलेची व्यथा

Pune Ambil Odha | आंबिल ओढ्यात कारवाई, घरं नाहीत, आमच्यावर उलटू नका, वृद्ध महिलेची व्यथा

| Updated on: Jun 24, 2021 | 11:23 AM

सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी आंबील ओढ्यात कारवाई सुरु केली आहे. दरम्यान तेथील रहिवाशी एका वृद्ध महिलेने घरं तोडू नका असं सांगत आपली व्यथा मांडली आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडल्यानंतर एक अत्यंत वृद्ध महिलेलाही अश्रू अनावर झाले असून तीही कॅमेऱ्यासमोर रडून आपली व्यथा मांडू लागली आहे.