पावसामुळे बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा पर्यटन हंगाम सुरु, अर्थचक्राला गती मिळणार?

पावसामुळे बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा पर्यटन हंगाम सुरु, अर्थचक्राला गती मिळणार?

| Updated on: Oct 01, 2023 | 1:00 PM

VIDEO | राज्यात सर्वाधिक वाघ असणारे आणि व्याघ्र पर्यटनासाठी ओळखला जाणाऱ्या चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम सुरु, ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात आज नव्या पर्यटन हंगामाची उत्साही सुरुवात झाली. विधीवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात दिला प्रवेश

चंद्रपूर, १ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वाघ असणारे आणि व्याघ्र पर्यटनासाठी ओळखला जाणाऱ्या प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन हंगाम पुन्हा सुरू झाल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पर्यटन विभागामार्फत देश-विदेशातील पर्यटकंना महाराष्ट्रात आकर्षित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या जातात. त्यापैकी ताडोबा देखील आहे. दरम्यान, चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची उत्साही सुरुवात झाली. विधीवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील कोअर भाग बंद होता. गेल्या काही काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बुकिंग वेबसाईट बाबतही काही अडचणी होत्या. मात्र त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापनाने या वेबसाईट बाबत तातडीने कारवाई करत साईट सुरळीत केली. जगभर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव वैविध्याची पर्यटकांना भुरळ आहे. ताडोबातील पर्यटन हंगाम सुरू झाल्याने अर्थचक्राला गती येण्याची इथल्या व्यावसायिकांना आशा आहे.

Published on: Oct 01, 2023 01:00 PM