Govt Bans Onion Exports : कांदा उत्पादकांमध्ये नाराजी; आंदोलनांचं सत्र कायम, उद्या कोंडी सुटणार ?
कांदा उत्पादकांमागील ग्रहण काही सुटतांना दिसतन नाही. निर्यात बंदीनंतर कांदा उत्पादक आक्रमक झालेत. तर दुसरीकडे राज्य सरकारवरील दबावही वाढत चालला आहे. आधीच अवकाळी पावसाचं सकंट, गारपिटीच्या माऱ्याने शेतकरी त्रस्त असताना कांदा उत्पादक अडचणीत सापडला
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : कांद्यांच्या निर्यात बंदीमुळे गेल्या दोन दिवसांपासून बाजार समित्या बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काही ठिकाणं मोठी आंदोलन झाली तर दुसरीकडे सरकारने याबाबत दिल्लीत जाऊन केंद्राशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलंय. कांदा उत्पादकांमागील ग्रहण काही सुटतांना दिसतन नाही. निर्यात बंदीनंतर कांदा उत्पादक आक्रमक झालेत. तर दुसरीकडे राज्य सरकारवरील दबावही वाढत चालला आहे. आधीच अवकाळी पावसाचं सकंट, गारपिटीच्या माऱ्याने शेतकरी त्रस्त होता त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक मदतीची शक्यता होती. मात्र त्याऐवजी केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याची निर्यात बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. हिवाळी अधिवेशनात कांद्याबरोबर, दूध, कापूस यासारखे मुद्दे गाजताय…बघा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या आणि भावना…?