Special Report | Pravin Darekar यांचं ‘मजूर’ Matter नेमकं काय?

| Updated on: Apr 04, 2022 | 10:25 PM

इतर संस्था आणि मजूर या संदर्भातील हे प्रकरण असताना इतर संस्था आणि फेडरल बँकेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते, असं सांगतानाच यावेळी पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

मुंबई: माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात चौकशी करण्यात आली. सभादसदत्वा संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. बँकेकडून काही लाभ घेतला गेला का? याबाबतही तीन तासात विचारणा करण्यात आली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. नोटीस पाठवून जवाब घ्या, असं आम्ही पहिल्या दिवसापासून वारंवार सांगत होतो. शेवटी 41 ए अंतर्गत नोटीस पाठवणं अपेक्षित होतं, आमची भूमिका पोलिसांकडे गेली पाहिजे त्याची माहिती पोलिसांना दिली. तेच तेच प्रश्न विचारून मला भांडावून सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ज्याची नियत साफ आहे, ज्याचं दामन साफ आहे त्याला त्रास होत नाही. जे जे विचारले त्याची उत्तरे दिली. यावेळी मला बरेचशे नियमबाह्य प्रश्न विचारले गेले. इतर संस्था आणि मजूर या संदर्भातील हे प्रकरण असताना इतर संस्था आणि फेडरल बँकेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते, असं सांगतानाच यावेळी पोलिसांवर दबाव असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.