Pariksha Pe Charcha 2025: विद्यार्थ्यांनो… असं पळवा टेन्शनला दूर, पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ टिप्स
‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजता झाले. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतांना दिसले तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या उदाहरणांनी विद्यार्थ्यांना उत्तरं दिली आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने पंतप्रधानां सवाल करताना असे म्हटले की, परीक्षेची चिंता आणि अपयश यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्याने काय करावे. यावर मोदी […]
‘परीक्षा पे चर्चा’चे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजता झाले. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतांना दिसले तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या उदाहरणांनी विद्यार्थ्यांना उत्तरं दिली आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात एका विद्यार्थ्याने पंतप्रधानां सवाल करताना असे म्हटले की, परीक्षेची चिंता आणि अपयश यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्याने काय करावे. यावर मोदी म्हणाले, “अपयश हा एक धक्का मानू नका… कोणत्याही परीक्षेतील गुण हे आयुष्यभराचे यश नसते. ते तात्पुरत्या स्वरूपाचे यश असते.” तर हे पटवून सांगताना मोदींनी क्रिकेटचं उदाहरण दिलं. एक फलंदाज स्टेडियममध्ये गोंधळ आणि गोंगाट असतानाही त्याच्या खेळावर लक्ष केंद्रीत करतो. त्याचप्रमाणे, तुम्ही कोणत्याही दबावांचा स्वतःवर परिणाम होऊ न देता त्याच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मोदींनी समजावून सांगितले. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आज, म्हणजे १० फेब्रुवारी २०२५ (सोमवार) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांसाठी अनेक टिप्सही शेअर केल्यात.

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
