My India My Life Goals: लोकं आधी पागल म्हणायचे, पण नंतर 1 लाख झाडे लावल्यामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मान
पागलची व्याख्या काय असं तुम्हाला विचारलं तर ते सांगता येणार नाही. पण ज्यांना समाज पागल समजतो तेच भविष्यात मोठं काहीतरी निर्माण करतात.
Green Warrier | तेलंगणातील रहिवासी असलेल्या दरिपल्ली रामय्या ( Daripalli Ramaiah ) यांनी पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी कोणाचीही वाट न पाहता स्वतः रोपटे लावण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मोहिमेला यश आले आणि आतापर्यंत त्यांनी 1 कोटीहून अधिक रोपे लावली आहेत. या मोहिमेसाठी त्यांनी आपली 3 एकर जमीनही विकली. जेव्हा ते घरातून बाहेर पडतात तेव्हा सोबत रोपे आणि बिया घेऊन जातात. 2017 मध्ये त्यांनी पर्यावरणासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.