पुणेकरांसाठी मोठी बातमी! निओ मेट्रोच्या कामाला गती, कोणत्या मार्गावर धावणार ही मेट्रो?
VIDEO | पुण्यातील निओ मेट्रोच्या संदर्भातील आराखडा मेट्रोकडून पालिकेला सादर, कशी आणि कोणत्या मार्गावर धावणार नियो मेट्रो?
पुणे : पुण्यातील नियो मेट्रोच्या कामाला गती मिळणार असून याबाबतचा आराखडा महा मेट्रोच्या वतीने पुणे महानगर पालिकेला सादर करण्यात आला आहे. शहरातील पुणे ते पिंपरी चिंचवड पर्यंत साधारण 44 किलोमीटरवर ही निओ मेट्रो धावणार आहे. महा मेट्रोच्या वतीने आराखडा सादर केल्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या वतीने ही पाहणी केली जाणार आहे. नाशिक शहरातही अशीच निओ मेट्रो केली जाणार आहे. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात निओ मेट्रो धावणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी महत्वाचा ठरणार असून त्याची प्रक्रिया कशी होते, अंमलबजावणी कशी केली जाते याकडे लक्ष लागले आहे. पुणे ते पिंपरी चिंचवड निओ मेट्रोसाठी 5 हजर 276 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. पालिकेचाही यामध्ये वाटा असणार आहे.