Pahalgam Terror Attack : पाकिस्तानने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, नेमकं काय होणार?
दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखील एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला भारताचे भूदल, नौदल आणि वायुदल अशा तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत. या बैठकीत मोदी फायनल निर्णय घेणार?
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशातच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा करत दोन्ही देशांतील युद्धाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढच्या चार दिवसांत युद्ध होऊ शकतं, असं म्हणत ख्वाजा असिफ यांनी युद्धाची वेळच सांगितली आहे. यानंतर दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग आलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्याच्या तयारी संदर्भात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडतेय. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेदेखील हजर आहेत. तर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. यासह तिनही सैन्य दलाचे अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय सेनेच्या तयारीचाही आढावा घेत असल्याचे पाहायला मिळाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

