PM Narendra Modi यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाची केली घोषणा, म्हणाले…
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभेत महिला आरक्षणासंबंधित नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची घोषणा, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय व्यक्त केली भावना? बघा व्हिडीओ
नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२३ | आज नव्या संसदेत विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले असता संसदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक घोषणा करून कामाचा धडाकाच जणू लावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आज गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महिला विधेयक संसद पटलावर मांडण्याची घोषणा केली. तर या निर्णयाला सर्व उपस्थित सदस्यांनी पाठिंबा देत महिला आरक्षण कायदा करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. तर मोदींकडून लोकसभेत महिला आरक्षणासंबंधित नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिला आरक्षण विधेयकावर बोलताना असे म्हणाले की, “सरकारने या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या पवित्र कामासाठी देवाने माझी निवड केली आहे. आज संविधान संशोधन विधेयक सादर होत आहे” या विधेयकामुळे सध्या सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. आता त्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला अधिक बळ मिळणार असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.