Gadchiroli | गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 जवान जखमी
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल सहा नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
नक्षलविरोधी पोलीस पथकाला गडचिरोली जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये तब्बल सहा नक्षलवाद्यांना ठार केले. पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलेय. आज (13 नोव्हेंबर) सकाळी धानोरा तालुक्यातील मुरूम गाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगड भागातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकाने कॉम्बिंग ऑपरेशन केले. या मोहिमेत जवळपास सहा नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम

