मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ‘या’ नेत्याचं मिश्किल भाष्य; म्हणाले, ‘“कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग…”’
VIDEO | मंत्रिमंडळ विस्तारावरून पत्रकारांवरही कुणी लगावला जोरदार टोला?
अमरावती : शिवसेना-भाजप अशी युती असली तरी आता मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी निवडणुकांवरून दोन्ही पक्षामध्ये नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यावरूनच आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळावर एक मिश्किल भाष्य केले आहे. बच्चू कडू यांच्या मिश्किल भाष्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरूये. राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ते म्हणाले की, कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई, मग जाय आपल्या माहेरा; पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था असल्याचा खोचक टोला त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर लगावला आहे. बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून पत्रकारांवरही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. विस्ताराबाबत बोलताना म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल, तुम्ही कशाला एवढं मनावर घेता असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आता तुम्हीही विस्ताराच्या बातम्या दाखवणे बंद करा कारण जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा दिवसभर बातम्या दाखवत जा असंही त्यांनी आपले मत व्यक्त केले.