Osmanabad | तुळजाभवानी मंदिर सुरु करण्यासाठी पुजारी आक्रमक, मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण

| Updated on: Aug 17, 2021 | 6:06 PM

राज्यातील सर्व व्यवहार खुले, रेल्वे , बस, मॉल दारूचे बार सुरू आहेत तरीही मंदिर धार्मिक स्थळे बंद का ? असा सवाल सरकारला पुजाऱ्यानी विचारला. उपोषणात व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत तुळजापूर बंदच इशारा पुजारी यांनी दिला आहे.

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई  तुळजाभवानी मातेचे मंदिर सुरू करण्यासाठी तुळजापूर येथील पुजारी व व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी मंदिरासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. दार उघड बये आता दार उघड , आई राजा उदो उदो अशी घोषणाबाजी करीत पुजारी व्यापारी यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. मंदिर बंद असल्याने पुजारी व्यापारी यांची उपासमार होत असून अर्थकारण ठप्प झाले आहे. राज्यातील सर्व व्यवहार खुले, रेल्वे , बस, मॉल दारूचे बार सुरू आहेत तरीही मंदिर धार्मिक स्थळे बंद का ? असा सवाल सरकारला पुजाऱ्यानी विचारला. उपोषणात व्यापारी, नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत तुळजापूर बंदच इशारा पुजारी यांनी दिला आहे.