‘मोदीजी, मन की बात बंद करा…’, युवक काँग्रेसकडून का अन् कुठं झळकले पोस्टर्स?
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेस आक्रमक, मणिपूरच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक
पुणे, ३१ जुलै २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराने जरी त्यांना गौरविण्यात येणार असलं तरी चर्चा आहे ती म्हणजे शरद पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. दरम्यान, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी यांच्या विरोधात युवक काँग्रेसची पोस्टरबाजी पुण्यात पाहायला मिळत आहे. ‘देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवानी कशासाठी, मोदीजी मन की बात बंद करा मणिपूर की बात करो’ अशा घोषणा असलेले बॅनर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात मिस्टर प्राईम मिनीस्टर गो टु मणिपूर अँण्ड फेस द पार्लिमेंट, अशा आशयाचे बॅनर बालगंधर्व डेक्कन चौकात झळकले असू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेस आक्रमक झाले आहे.