'स्वत:चे दोष लपवण्यासाठी चिन्ह आणि विचार चोरले', पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

‘स्वत:चे दोष लपवण्यासाठी चिन्ह आणि विचार चोरले’, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

| Updated on: Aug 10, 2023 | 8:33 PM

VIDEO | विरोधकांनी INDIA ते तुकडे केले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चढवला हल्ला, मतदारांना आकर्षित करण्यासाठी गांधी नावाची देखील केली चोरी...

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ | लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘निवडणूक चिन्हासह सर्व काही आपले असल्याचा दावा काँग्रेस करत असते. पण प्रत्यक्षात ते दुसऱ्यांकडून चोरले आहे. स्वतःचे दोष लपवण्यासाठी त्यांनी चिन्ह आणि विचार देखील चोरले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व ठिकाणी आपले नावे दिली. सरकारी योजना त्यांच्या नावावर चालवली. रस्ते, रुग्णालये, शैक्षणिक संस्थांना त्यांची नावे दिली. परंतु काम दिसले नाही. त्या योजनांमध्ये हजारो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. पक्षाचे संस्थापक एक विदेशी व्यक्ती होते. १९२० साली देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात नवी ऊर्जा मिळाली तर त्यांनी ध्वज देखील चोरला, काँग्रेसने या ध्वजाची ताकद ओळखली आणि तोच त्यांनी स्विकारला. मतदारांना आकर्षित करण्यासाठी गांधी नावाची देखील चोरी केली.’, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

Published on: Aug 10, 2023 08:32 PM