‘आकाचा आका कोण? धनंजय मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे’, कोणी केला आक्रमक सवाल?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राजकीय वर्तुळासह राज्यभरातून होत आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. […]
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राजकीय वर्तुळासह राज्यभरातून होत आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आता राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. याच मोर्च्यातून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी आकाचा आका कोण? असा सवालही अरविंद शिंदे यांनी केला. इतकंच नाहीतर अरविंद शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना थेट संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांसह धनंजय मुंडे यांच्याही फाशीची मागणी केली आहे. ‘मराठा समाज हा न्याय देण्याच्या भूमिकेत होता, आज तो समाज न्याय मागण्याच्या भूमिकेत आला आहे. हे कुणी केली? त्या आकाचा आका कोण? त्यालाही रस्त्यावर आणलं पाहिजे आणि मारेकऱ्यांसह धनंजय मुंडे यांना फाशी झाली पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी यावेळी आहे.