Pune | दौंडमध्ये तीन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

| Updated on: Mar 07, 2022 | 12:33 PM

दौंड तालुक्यातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ असेलेल्या साठवण तलावात(pond) बुडून तीन युवकांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ असेलेल्या साठवण तलावात(pond) बुडून तीन युवकांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. त्यानंतर शोधाशोध सुरु केली असता पाण्याच्या तलावाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर शोध घेतला असता तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले.

VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11.30 AM | 7 March 2022
VIDEO : मुंबै बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सरकारने चौकशी करावी : Suresh Das