प्रश्नांची उत्तर न देताच दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप, ते उठले अन् निघून गेले…
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना सवाल करत असतानाच त्यांनी काढता पाय घेतल्याचे पाहायला मिळाले.
‘आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी अॅडमिशनच्या फॉर्मवर चौकोन करून दहा लाख रुपये डिपॉझिट नमूद केले’, असं म्हणत दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ, धनंजय केळकर यांनी १० लाख रूपये डिपॉझिटची मागणी केल्याच्या मुद्द्यावर रूग्णालयाची बाजू मांडली. दरम्यान, आज दुपारी डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा दिली. या राजीनाम्यानंतरच डॉ, धनंजय केळकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयात असलेल्या रुग्णावरील उपचारात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून येत्या दोन ते तीन दिवस ते आपली सेवा देतील आणि त्यानंतर घैसास त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होतील, अशी माहिती डॉ. धनंजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान, गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदेत एक एक पत्रकार सवाल करत होते. मात्र पत्रकार त्यांना प्रश्न विचारत असतानाच डॉ. धनंजय केळकर यांनी कोणतीच उत्तरं न देता पत्रकार परिषद पॅकअप केल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही तेच तेच तेच प्रश्न विचारत आहात, असं सांगत त्यांनी पत्रकार परिषद अक्षरश: गुंडाळली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

