Pune | गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील, एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका
पुण्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आमची कोणतेही संघटना नसून गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे.
पुण्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत…आमची कोणतेही संघटना नसून गुणरत्न सदावर्ते हेच आमचे वकील असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं वकील बदलण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील असल्याचं म्हटलं आहे. 22 संघटनांना आम्ही मूठमाती दिल्याचं एसटी कर्मचारी म्हणाले आहेत.
Latest Videos