पुणे टॉप न्यूज, पुण्यात प्रिपेड रिक्षा सेवाला सुरुवात

| Updated on: Feb 04, 2023 | 9:51 AM

रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यार्डसाठी २५ कोटी तर घोरपडीत होत असलेल्या वंदे भारतच्या रेल्वे लाईनसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले आहे ते मुख्य नऊ घटनांमधून जाणून घेऊ या. पुणे शहरात प्रिपेड रिक्षा सुरु होणार आहे. तीन ठिकाणी ही सेवा सुरु होणार आहे. पुणे रेल्वे स्टेशन, वाकडेवाडी आणि स्वारगेट बसस्थानकात ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात पुणे शहरासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यार्डसाठी २५ कोटी तर घोरपडीत होत असलेल्या वंदे भारतच्या रेल्वे लाईनसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात पुणे विभागात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांना रेल्वेमंत्र्यांनी अतिरिक्त निधीचे वाटप केले आहे. यामुळे पुणे विभागातील प्रकल्पांना गती मिळणार आहे.

Published on: Feb 04, 2023 09:51 AM