ठाकरे गटाला धक्का, आदित्य ठाकरे यांचा खास मित्र उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!
ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आहेत. मात्र आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया कनाल यांनी व्यक्त केली होती. राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअॅप ग्रूप सोडला होता.कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. राहुल कनाल हे शिंदे गटात जाणार असल्याची बातमी आमदार नितेश राणे यांनी दिलीय.
Published on: Jun 30, 2023 01:27 PM