लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटानं ‘इतक्या’ जागांवर केला दावा
VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक काल वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर राहुल शेवाळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात काय केलं भाष्य?
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२३ | लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून २२ जागांवर दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या २२ जागांवर शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यावर भर असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केलंय. तर उर्वरित ठिकाणी भाजप, राष्ट्रवादीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक काल वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर शेवाळे माध्यमांशी बोलत होते. इतकंच नाहीतर भाजपकडून ४५ जागा निवडून आणण्याचा निर्धारही करण्यात आलाय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Published on: Oct 17, 2023 12:57 PM
Latest Videos