Kokan Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, पुन्हा 30 दिवसांचा मेगाब्लॉक; जाणून घ्या कधी अन् कुठे?
येत्या ३० जून ते ३० जुलैदरम्यान कोकण रेल्वेकडून हा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकच्या कामादरम्यान, कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत राहणार असल्याचे कोकण रेल्वेने प्रवाशांना कळविले आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलवर यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने तब्बल एक महिन्याचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या ३० जून ते ३० जुलैदरम्यान कोकण रेल्वेकडून हा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वेच्या या मेगा ब्लॉकच्या कामादरम्यान, कोकण रेल्वेच्या नेत्रावती, मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत राहणार असल्याचे कोकण रेल्वेने प्रवाशांना कळविले आहे. तिरुवनंतपूरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (१६३४६) या नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेल स्थानकावर समाप्त होणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनल- तिरुवनंतपूरम सेंट्रल (१६३४५) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास लोकमान्य टिळक टर्मिनलऐवजी पनवेल स्थानकातून सुरू होईल. यासोबत दररोज धावणाऱ्या मंगलुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनल (१२६२०) मत्स्यगंधा एक्स्प्रेसचा प्रवास पनवेलस्थानकावर समाप्त केला जाणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनल- मंगळुरू सेंट्रल (१२६१९) मत्स्यगंधा एक्स्प्रेस दररोज सांयकाळी ४:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटणार असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे.
![तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी? तुमच्या रुग्णालयाचं खर्च होईल कमी; मोदींची अर्थसंकल्पात गॅरंटी?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Budget-2024-Medical-Expenses-%E0%A5%AE.jpg?w=670&ar=16:9)
![सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो.. सोनाक्षी सिन्हासोबतच्या लग्नानंतर सासूची काळजी घेताना दिसला झहीर, 'तो' फोटो..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Sonakshi-Sinha-mom.jpg?w=670&ar=16:9)
![Sara Tendulkar : सारा तेंडुलकरला सर्वात जास्त प्रिय कोण? त्याच्यासोबत शेअर केला फोटो Sara Tendulkar : सारा तेंडुलकरला सर्वात जास्त प्रिय कोण? त्याच्यासोबत शेअर केला फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/sara-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
![Shweta Tiwari : श्वेता तिवारीला सर्वात जास्त समाधान कुठे आणि कशामध्ये मिळतं? Shweta Tiwari : श्वेता तिवारीला सर्वात जास्त समाधान कुठे आणि कशामध्ये मिळतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/feature-24.jpg?w=670&ar=16:9)
![वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर... वडिलांनी सोडली साथ, आईला घरच्यांनी तिला त्रास, रेल्वे ट्रॅकवर झोपण्याची वेळ, अभिनेत्याने अखेर...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Sai-Ketan-Rao.jpg?w=670&ar=16:9)
![अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ अमृता खानविलकरचा साडी लुक, चाहते घायाळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Amruta-Khanvilkar-1-1.jpg?w=670&ar=16:9)