Raj Thackeray : ‘औरंगजेब इथंच गाडला असा बोर्ड लावा, तिथे शाळेच्या सहली…’, राज ठाकरेंनी कबरीच्या वादावरून सुनावलं
'फडणवीस तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आहे. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा असणार आहे', असं राज ठाकरे म्हणाले. बघा काय म्हणाले राज ठाकरे?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद रंगतोय. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुनावल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क येथे गुढी पाडवा मेळाव्यातून याविषयावर भाष्य केले. ‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला असा बोर्ड लावा. तर औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या सहली घेऊन गेलं पाहिजे’, असं वक्तव्य करत राज ठाकरेंनी आपलं मत व्यक्त केले आहे. पुढे राज ठाकरे असंही म्हणाले की, सिनेमाने जागा होणारा हिंदू काहीच कामाचा नाहीये. तर संभांजी राजेंचं बलिदान आता कळंल का? असा संतप्त सवाल देखील राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ‘जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लाव. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…’, असं थेट भाष्यच राज ठाकरेंनी केलं.

'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती

14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर

भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू

'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
