Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींची बजावली नोटीस; काय आहे प्रकरण?
VIDEO | दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांना 19 हजार 750 कोटींची बजावली नोटीस
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या नोटीसमुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांना राशिद खान यांनी 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयात राशिद खान यांनी एक याचिका दाखल केली. यानुसार 19 हजार 750 कोटींच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस आदित्य ठाकरे यांना बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा न्यायालीयन प्रक्रियेला सामोरे जावं, असं या याचिकेतून आदित्य ठाकरे यांना बजावण्यात आले आहे. तर आदित्य ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी. वृत्तपत्रातून त्यांना माफीनामा द्यावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

