भीषण! मुंबई-गोवा महामार्ग 12 पेक्षा जास्त तास उलटले तरी ठप्पच, LPG टँकरमधून गॅस गळतीचा धोका
Ratnagiri LPG Tanker Accident : गॅस गळती थांबण्याचे अजूनही प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर अजूनही या ठिकाणी बचावकार्य केलं जातंय. या अपघातात गॅस टॅकरचं मोठं नुकसान झालंय.
मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक 12 हून अधिक तास उलटले तरी ठप्पच आहे. अंजनारी पुलावरुन केली जाणारी वाहतूक काल दुपारपासून थांबवण्यात आली होती. ही वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. एका गॅस टँकरचा गुरुवारी अपघात झाला होता. तेव्हापासून या मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक अजूनही जैसे थेच आहे.मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) गुरुवारी भीषण अपघात (Road Accident) झाला होता. एलपीजी टँकर रत्नागिरीतील अंजनारी (Anjnari Bridge LPG Tanker Accident) पुलावरुन थेट खाली कोसळला. एलपीजी टँकर पलटी होऊन गॅस गळती होऊ लागली. त्यामुळे भीती व्यक्त केली जातेय. संभाव्य धोका लक्षात घेता अंजनारी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक प्रभावित झालीय. गॅस गळती थांबण्याचे अजूनही प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातानंतर अजूनही या ठिकाणी बचावकार्य केलं जातंय. या अपघातात गॅस टॅकरचं मोठं नुकसान झालंय. सध्या मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक दाभोळ या पर्यायी मार्गावरुन वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त टँकरमध्ये तब्बल 18 मॅट्रिक टन इतका गॅस होता. उरणवरुन एक टीम एलपीजी टँकरचं रेस्क्यू करण्यासाठी तैनात करण्यात आलीय. 12 तासांनंतरही अंजनारी पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली नाही. दरम्यान, अंजनारी पुलारील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सर्व प्रशासकीय यंत्रणांकडून केले जात आहेत.