Women safety | महिलांना दिलासा, आता रिक्षानं प्रवास करणाऱ्या महिला राहणार सुरक्षित कारण…
VIDEO | मुंबईतील महिला प्रवाशी आता राहणार सुरक्षित... प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओने आणि ऑटोरिक्षा संघटनांनी उपनगरांमध्ये वेगळ्या अन् स्वतंत्र रांगा तयार करण्याचा घेतला पुढाकार
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | मुंबईतील महिला प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओने आणि ऑटोरिक्षा संघटनांनी उपनगरांमध्ये वेगळ्या अन् स्वतंत्र रांगा तयार करण्याचा पुढाकार घेतला आहे. आता मालाड आणि गोरेगावमध्ये सामायिक ऑटो स्टँडवर महिलांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत. महिला प्रवाशांची होणारी धक्काबुक्की आणि ड्रायव्हरने तीनपेक्षा जास्त प्रवाशांना बसल्यावर होणारी अस्वस्थता यासारख्या घटनांबाबत तक्रारी केल्यानंतर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची सुरुवात मालाड आणि गोरेगाव येथून होत आहे. मात्र येत्या काही दिवसांत संपूर्ण मुंबईत हा नियम लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर ऑटोचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद-विवाद टाळण्यासाठी युनियनने आरटीओकडे त्यांच्या महामंडळाची वेगळी मागणी केली आहे.
Published on: Sep 15, 2023 05:12 PM
Latest Videos