नागपुरातील 'मविआ'च्या वज्रमूठ सभेचा मार्ग मोकळा, बघा कशी सुरूये तयारी?

नागपुरातील ‘मविआ’च्या वज्रमूठ सभेचा मार्ग मोकळा, बघा कशी सुरूये तयारी?

| Updated on: Apr 14, 2023 | 12:09 PM

VIDEO | नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला परवानगी, 16 एप्रिल रोजी नागपुरात होणार महाविकास आघाडीची रॅली

नागपूर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नागपूर पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे 16 एप्रिल रोजी नागपूर शहरात महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावनानगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता, या सभेची दखल घेत पोलिसांनी देखील या सभेला अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली आहे. यासभेच्या मैदानाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने महाविकास आघाडीला दिलासा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मविआच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Apr 14, 2023 12:04 PM