‘भाजपाचा डीएनए गोळवलकर आणि हेडगेवार विचारांचा’, कुणाचं टीकास्त्र?
VIDEO | 'हिम्मत असेल तर भाजपनं गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या नावाने मतं मागावी...', कुणी दिलं चॅलेंज
मुंबई : सध्या राज्यामध्ये वाचाळवीर लोकांची संख्या खूप वाढत आहे त्यांना माहित नसेल तर माहिती करून घ्यावी महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे तरीसुद्धा राज्यामध्ये स्वतःला हुशार समजणारे भाजप नेते महाविकास आघाडीचा डीएनए अत्यंत चुकीचा आहे परंतु भाजपा नेत्यांनी ध्यानात ठेवावे महाविकास आघाडीचा डीएनए रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा आहे आणि भाजपाचा डीएनए हा गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचा डीएनए आहे त्यामुळे हिम्मत असेल तर भाजप नेत्यांनी गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या नावाने मते मागावी मग कोणाचा डीएनए भारी आहे हे नक्कीच तुम्हाला समजेल, असे म्हणत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.