'रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्या भविष्यकारांची उपासमार करू नका', शरद पवार यांना कुणी लगावला टोला

‘रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्या भविष्यकारांची उपासमार करू नका’, शरद पवार यांना कुणी लगावला टोला

| Updated on: Mar 04, 2023 | 3:45 PM

VIDEO | 'शरद पवार यांच्या पक्षात इन्कमिंग नसताना कोणाच्या जीवावर परिवर्तनाच्या गोष्टी करताय, या नेत्याची खोचक टीका

सोलापूर : राज्यात कुठेही बदलाचे वारे नाहीत. उगाच भविष्यकार होऊन रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसणाऱ्यांची उपासमार करू नका. परिवर्तनाचे स्वप्नरंजन करू नका, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथील पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच राज्यात सध्या भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे. इतर कुठल्याही पक्षात इन्कमिंग नाही. त्यामुळे शरद पवार इन्कमिंग नसताना कोणाच्या जीवावर परिवर्तनाच्या गोष्टी करत आहेत. यांचे आश्चर्य वाटते. तसेच संजय राऊत यांच्या बाबत प्रश्न विचारताच ‘कोण संजय राऊत’ असा उपरोधिक प्रश्न देखील मंत्री विखे पाटील यांनी केला.

Published on: Mar 04, 2023 03:45 PM