रिक्षाचालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अभिमान,ठाण्यात पोस्टरबाजी!

रिक्षाचालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अभिमान,ठाण्यात पोस्टरबाजी!

| Updated on: Jul 07, 2022 | 11:56 AM

अर्थात त्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देखील दिलं होतं. पण जेव्हा पासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत तेव्हपासून रिक्षावाला मुख्यमंत्री असं अभिमानाने सगळीकडे म्हटलं जातंय.

मुंबई : महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकारला सत्तेतून खाली खेचत राज्यात शिंदे सरकार आलं आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 अशा फरकाने जिंकलाय.शिंदे यांच्या सभागृहातील भाषणावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी टोला लगावला होता. रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. अर्थात त्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देखील दिलं होतं. पण जेव्हा पासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत तेव्हपासून रिक्षावाला मुख्यमंत्री (CM Eknath Shinde)असं अभिमानाने सगळीकडे म्हटलं जातंय. ठाण्यात सुद्धा याच संदर्भात पोस्टरबाजी करण्यात आलीये. ही पोस्टरबाजी केलीये ठाण्यातल्या रिक्षा चालकांनी ज्यावर त्यांनी लिहिलंय “होय आम्हाला अभिमान आहे आमचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला!”

Published on: Jul 07, 2022 11:56 AM