पांढरा शर्ट, गळ्यात उपरणं अन् हातात वडापाव; पोटनिवडणुकीच्या प्रचारात रोहित पवार दंग
महाविकास आघाडीकडून कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार केला जातोय. या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही उतरलेत. यावेळी त्यांनी वडापाववर ताव मारला. पाहा व्हीडिओ...
पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीकडून कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार केला जातोय. या निवडणूक प्रचारात राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही उतरलेत. यावेळी आमदार रोहित पवार आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी वडापाववर ताव मारला. “मी वडापाव खातोय. यामागे स्टोरी आहे. सकाळपासून मी काहीही खाल्लेल नाही. सकाळी मी कसब्यात प्रचार केला. त्यानंतर इथं प्रचारासाठी आलोय. त्यामुळे कार्यकर्त्यांना आणि मला पण भूक लागली आहे. म्हणून आम्ही वडापाव खातोय”, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
Latest Videos