Ratnakar Gutte : रत्नाकर गुट्टे यांच्या वाहनासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, कार अडवली अन्…
मराठा आरक्षणाचा फटका वारंवार रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसताना दिसतोय. मागे कार्यक्रमाचे उद्घाटन रोखल्यानंतर आज गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे त्यांना गावात प्रवेश नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मराठा कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी देखील केली.
परभणी, १२ नोव्हेंबर २०२३ | राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप गाजतोय. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा आरक्षणाचा फटका वारंवार रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसताना दिसतोय. मागे कार्यक्रमाचे उद्घाटन रोखल्यानंतर आज गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे त्यांना गावात प्रवेश नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मराठा कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी देखील केली. परभणीच्या गंगाखेड येथील पडेगावमध्ये कीर्तनाच्या एका कार्यक्रमासाठी आमदार रत्नाकर गुट्टे आले होते. मात्र परभणीच्या गंगाखेड मधील पडेगाव येथील गावात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पुढाऱ्यांना अद्याप बंदीच असल्याचे पाहायला मिळाले. ही बंदी असल्याने गावातील सकल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीसमोर येत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांना परतून लावल्याचा प्रकार पाहायला मिळाला.